जालना (प्रतिनिधी) क्रीडा दिनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते क्रीडा दिवस उत्साहात साजरी करण्यात आला. तसेच याच दिवशी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते संघर्ष स्पोर्ट्स सेवाभावी संस्था च्या वतीने क्रिकेट अकॅडमी चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख, एडवोकेट अमजद, अकॅडमीचे अध्यक्ष सुगंधी हीरे, अकॅडमीचे कोच रहमत शेख वसीम मन्यार तसेच क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राठोड बोलतांना म्हणाले की, तरुण पिढीने जास्तीत जास्त मैदानी खेळावर लक्ष केंद्रित करावे तसेच क्रीडा क्षेत्रात आपले करियर घडवावे. तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहून मैदानी खेळावर जास्त लक्ष द्यावे. खेळाच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे यावेळी ते म्हणाले. तसेच आवश्यक असलेली सर्व क्रीडा साहित्य तसेच क्रिडांगण आपण शासनाकडून आणण्याचे यावेळी आश्वासन जिल्हाधिकारी डॉ.राठोड यांनी दिले. तसेच त्यांनी या अकॅडमीचे सुरुवात केल्याबद्दल सुगंधी हीरे यांना शुभेच्छा दिल्या.