टोकियो पॅरालिम्पिक: ‘भारताची लेक’ अवनी लेखराने घडवला इतिहास

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू अप्रतिम कामगिरी करत आहेत. भारताची अवनी लेखराने देशासाठी मोठी कामगिरी केली आहे. यावर्षी पॅरालिम्पिक्समध्ये आधीच सुवर्णपदक जिंकलेल्या जयपुरच्या या पॅरा शूटरने आता आणखी एक पदक मिळवले आहे. यावेळी तिने महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोजिशन एसएच १ या स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आहे. ती या स्पर्धेत ४४५.९ चा स्कोर करत स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर आहे. तिने मिळवलेल्या या पदकामुळे यवर्षी भारताची पॅरालिम्पिकमधील पदकांची संख्या १२ झाली आहे.

या स्पर्धेत चीन ची झांग क्यूपिंग आणि जर्मनीची हिलट्रॉप नताशा यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकली आहेत. क्वालिफिकेशनमध्ये अवनी लेखरा ११७६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिली होती.

पॅरालिम्पिकमध्ये याआधी अवनीने आर-२ १० मीटर एअर रायफल महिला स्पर्धेत क्लास एसएच १ मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तिने जिंकलेले हे पदक भारतासाठी इतिहासातील पॅरालिम्पिकमध्ये शूटिंगमधील पहिले सुवर्णपदक ठरले आहे.

पॅरालिम्पिकमध्ये याआधी अवनीने आर-२ १० मीटर एअर रायफल महिला स्पर्धेत क्लास एसएच १ मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तिने जिंकलेले हे पदक भारतासाठी इतिहासातील पॅरालिम्पिकमध्ये शूटिंगमधील पहिले सुवर्णपदक ठरले आहे.

अवनी ठरली दोन पॅरालिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू
अवनी पॅरालिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकणारी पहिलीच महिला खेळाडू आणि एकंदरित दुसरी खेळाडू बनली आहे. याआधी जोगिंदर सिंग सोढी खेळाच्या एकाच प्रकारामध्ये अनेक पदक जिंकणारे पहिले भारतीय होते. त्यांनी १९८४ मध्ये एक रौप्य आणि दोन कांस्यपदक जिंकले होते. यामध्ये त्यांनी गोळाफेकमध्ये रौप्य आणि थाली फेक व भाला फेकमध्ये दोन कांस्यपदक जिंकले होते. याव्यतिरिक्त पॅरालिम्पिक/ऑलिम्पिकमध्ये २ पदकं जिंकणारी पहिली नेमबाज आहे.

यावर्षीच्या पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत १२ पदके जिंकली आहेत. भारताने आतापर्यंत स्पर्धेत २ सुवर्ण, ६ रौप्य आणि ४ कांस्यपदके मिळवली आहेत. यापूर्वी रियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने २ सुवर्णपदकांसह ४ पदके जिंकली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींंनी केले कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अवनीचे कौतुक केले आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून पोस्ट करत अवनीचे कौतुक केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले, “टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आणखी गौरव! अवनी लेखराच्या अप्रतिम प्रदर्शनाने उत्साहित आहे. तिला कांस्यपदकासाठी शुभेच्छा. भविष्यातील प्रयत्नांसाठी तिला खूप-खूप शुभेच्छा.”

You might also like

Comments are closed.