जालना (प्रतिनिधी)-भारतीय स्वातंत्र्यला 75वर्ष पूर्ण होत आहे या निमित्ताने आजादी का अमृतमहोत्सव या कार्यक्रमाच्या अंतर्गत आज जालना शहरात फिट इंडिया रन 2.0 चे आयोजन करण्यात आले.नेहरू युवा केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना जालना यांच्या संयुक्त विद्यमाने हा फिट इंडिया रन घेण्यात आला.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी हिरवी झेंडा दाखवून या रन ची सुरुवात केली. जालना शहरातील गांधी चमन येथून ही फिट इंडिया रन निघून मोतीबाग येथे या रन च समारोप झाला. तसेच सहभागी झालेल्या खेळाडूंना स्पोर्ट्स कैपचे वितरण करण्यात आले.
यावेळी “हम फिट तो इंडिया फिट”,”हम फिट तो जालना फिट,जालना फिट तो इंडिया फिट”अशा घोषणा या रन मधील सहभागी तरुण तरुणींनी दिल्या.यामध्ये शहरातील असंख्य तरुण-तरुणींनी सहभाग घेतला होता. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष आबा दानवे, सिद्धिविनायक मुळे, शिवाजी खरात जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र जालना, राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय अधिकारी प्राध्यापक डॉक्टर पाटील, डॉक्टर कैलास सचदेव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी उपस्थितांना रनिंग चे फायदे दाखविले. तसेच नेहमी व्यायाम करत राहणे हे शरीरासाठी लाभदायक असल्याचे सांगितले. यावेळी डॉक्टर सचदेव बोलताना म्हणाले की, व्यायाम किंवा रनिंग हे शरीरासाठी एक उत्तम असे पर्याय आहे,मोबाईल वर जास्त वेळ घालवण्यापेक्षा ग्राउंडवर वेळ घालून स्वतःचे आरोग्य चांगले बनवावे असे ते उपस्थितांना बोलताना ते म्हणत होते.त्यामुळे माणूस निरोगी राहू शकतो. तसेच सिद्धी विनायक मुळे बोलतांना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या संकल्पनेतून ‘दौडेगा इंडिया तभी फिट रहेना इंडिया’या संकल्पनेचे उदाहरण देत आपण जर फिट असलं तर आपले राज्य फिट राहील आणि राज्य फिट असेल तर देश फिट राहील. म्हणून व्यायाम करत राहावे अशी तरुणांना आवाहन केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी नेहरू युवा केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉक्टर खाडे यांनी तर आभार डॉक्टर पाटील यांनी मानले.