कोल्हापूर(प्रतिनिधी)- छत्रपती शाहू सहकारी कारखान्यामार्फत ( कागल जि. कोल्हापूर) येत्या ४ते ६ ऑक्टोबरदरम्यान मॅटवरील कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या आहेत. ही स्पर्धा प्रथमच कुस्तिशौकिनाच्या अनुपस्थित होणार आहे. स्पर्धेचे हे ३५ वे वर्ष आहे, अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कारखाना कार्यक्षेत्र आणि कागल तालुक्यातील नव मल्लांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ही स्पर्धा भरवली जाते. कारखान्याच्या बंदिस्त गोदामात ही स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धेसाठी प्रेक्षकांना प्रवेश नसला तरी स्पर्धेचे प्रेक्षपन फेसबुक पेजवर ऑनलाईन केले जाणार आहे. स्पर्धेसाठी उतरणाऱ्या पैलवानांना कोरोना चाचणी सक्तीची आहे. ही स्पर्धा १४, १६,१९ वर्षाखालील गटात होणार असून, महिला कुस्तीगीर यांच्यासाठी ४४, ५५, ६५ अशा वजनी गटात स्पर्धा पार पडणार आहे, अशी माहितीही घाटगे यांनी दिली.यावेळी कारखान्याचे व्हॉईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, हिंदकेसरी दीनानाथ सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.