यु.ई.एफ ए चॅम्पियन लीग 2021-22 च्या सत्रास सुरुवात झाली आहे. यामध्ये मॅच डे वनला मॅंचेस्टर युनायटेडचा आश्चर्यकारक पराभव झाला आहे. यंग बॉईज या संघाकडून 2-1 अशा फरकाने मँचेस्टर युनायटेडचा धक्कादायक पराभव झाला. या सामन्यांमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो ने चॅम्पियन्स लीगमध्ये सर्वात जास्त सामने खेळण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.
सामन्याच्या तेराव्या मिनीटाला जुवेंटस मधून मॅंचेस्टर युनायटेड मध्ये परत आलेल्या क्रिस्तियानो रोनाल्डो ने ब्रुनो फर्नांडेस च्या पासवर गोल केला. मात्र नंतर यंग बॉईज कडून 66 व्या मिनिटाला गामालेऊने तर 95 व्या मिनिटाला सीबचेऊ ने निर्णय गोल करून संघाला विजय मिळवून दिला. सामन्याच्या 35 व्या मिनिटाला मॅंचेस्टर युनायटेडचा खेळाडू व्हैन बीसाका यास खराब कामगिरीमुळे रेड कार्ड दाखविण्यात आले.