दुबई- वर्ल्डकप मध्ये आज दक्षिण आफ्रिकेसमोर वेस्ट इंडिजच्या आव्हान होते. तर यामध्ये दक्षिण आफ्रिकेने वेस्टइंडीज चा आठ गड्यांनी पराभव केला आहे. यासह माजी विश्वविजेता वेस्टइंडीज सलग दोन सामने हरली आहे.विश्वचषकाच्या सुरुवातीलाच आश्चर्यकारक निकाल पाहायला मिळत आहेत. 4 शटकात मात्र 14 धावा देणारा ऐनरीच या सामन्यात सामनावीर ठरला आहे.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्टइंडीज तर्फे लेविस शिवाय एकही फलंदाज साजेशी प्रमाणे प्रदर्शन करू शकला नाही. स्टार खेळाडू ख्रिस गेल सलग दुसऱ्या सामन्यात फ्लॉप ठरला. आंद्रे रसेल आणि कायरण पोलांड यांनी ही संघाला निराश केले. लेविस ने सर्वाधिक 56 धावा केल्या. मात्र त्याला योग्य तसेच साथ ना मिळाल्याने वेस्टइंडीज मात्र 143 धावांपर्यंतच मजल मारू शकली.
दक्षिण आफ्रिकेकडून ड्वेन प्रिटोरियस ने सर्वाधिक तीन गडी बाद केले. तर सामनावीर पटकाविलेल्या अनरीच ने 4 शतकात मात्र 14 धावा देऊन एक गडी बाद केला. धावांचा पाठलाग करीत असताना दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दक्षिण आफ्रिकेने हे लक्ष सहज पार केले. आफ्रिकेकडून मार्करमने सर्वाधिक 51 धावा केल्या. त्याच्याशिवाय हेंड्रिक्स व दुसनने प्रत्येकी 43 व 39 धावा केल्या. वेस्टइंडीज कडून एक विकेट अखिल हुसेन ने तर दुसरी विकेट धावा च्या स्वरूपात बाद झाली.