दुबई- मंगळवार रोजी वर्ल्डकप मध्ये दुसऱ्या सामन्यांमध्ये पाकिस्तानसमोर न्यूझीलंडच्या आव्हान होते.यामध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या बळावर न्यूझीलंडचा पराभव करीत स्पर्धेतील आपला दुसरा विजय नोंदविला आहे. पहिल्या सामन्यात गोलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने भारताचा पण धुव्वा उडविला होता. चार गडी बाद करणारा जलदगती गोलंदाज हारीस रौफ या सामन्यात सामनावीर ठरला आहे. तर उद्या इंग्लंड समोर बांगलादेश आणि स्कॉटलांड समोर नामिबिया चे आवाहन असणार आहे.
नाणेफेक जिंकून पाकिस्तान मे प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मागील सामन्यात प्रमाणे या सामन्यातही पाकिस्तानच्या गोलंदाजांनी कर्णधाराला निराश केले नाही. न्यूझीलंडचा एकही फलंदाज अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन करू शकला नाही. सर्व फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजीसमोर गुडघे टेकले. यामुळे न्युझीलँड फक्त 134 धावा करु शकला.न्यूझीलंडकडून मिचेल आणि कन्वे दोघांनी सर्वाधिक प्रत्येकी 27 धावा केल्या.धावांचा पाठलाग करीत असताना पाकिस्तानची सुरुवात चांगली राहिली.
शानदार फॉर्मात असलेला रिजवान या सामन्यातही चमकला . त्याने सर्वाधिक 33 धावा केल्या. अनुभवी मलिक नेही 26 धावांचे योगदान दिले. तर शेवटी आसिफ अली ने तीन षटकार खेचून 27 धावा करून विजयश्री खेचून आणली. न्युझीलँड कडून सोढीने सर्वाधिक दोन गडी बाद केले