व्हिडिओ पहा: बुमराहनं जेन्सनचा बदला घेतला

भारत आणि दक्षिण आफ्रिकेत यांच्यातील तीन सामन्याच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना केपटाऊन (Cape Town) येथे खेळला जातोय. केपटाऊन कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी गुघडे टेकले. या सामन्यात जसप्रीस बुमराहनं पाच विकेट्स घेतले आहेत. त्यानं सातव्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केलाय. याशिवाय, त्यानं मार्को जेन्सनचाही बदला घेतलाय. बुमराहनं 63 व्या षटकात उत्कृष्ट चेंडूव जेन्सनला माघारी धाडलंय. या दोघांत दुसऱ्या कसोटी सामन्यात वाद झाला होता.

 

बुमराहनं मागच्या डावात झालेल्या वादाचा हिशोब चुकता केलाय. बुमराहनं 63 व्या षटकात उत्कृष्ट चेंडू टाकून जेन्सनच्या दांड्या उडवल्या. जसप्रीत बुमराहचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. तसेच या व्हिडिओ भारतीय चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव केला जात आहे.

 

दुसऱ्या कसोटीत काय घडलं होतं?
जोहान्सबर्ग कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह फलंदाजी करण्यासाठी आला होता, तेव्हा जेन्सन सतत त्याच्या अंगावर चेंडू टाकले. एवढेच नव्हे तर, त्यानं बुमराहला काही तरी बोलत असल्याचंही पाहायला मिळालं. जेन्सनच्या गोलंदाजीवर बुमराह संघर्ष करताना दिसला. अखेर जेन्सनच्या गोलंदाजीवर त्यानं आपली विकेट्स गमावली. दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावातील 54व्या षटकात हा प्रकार घडला होता.

भारताची उत्कृष्ट गोलंदाजी
बुमराहनं या सामन्याच्या पहिल्या डावात एकूण पाच विकेट्स घेतल्या. त्याव्यतिरिक्त मोहम्मद शमी आणि उमेश यादवनं यांनाही प्रत्येकी दोन विकेट्स प्राप्त झाल्या आहेत. तसेच शार्दुल ठाकुरनं एक विकेट घेतली. भारतीय संघ पहिल्या डावात 223 धावांवर सर्वबाद झाला होता. तर दक्षिण अफ्रिका संघ पहिल्या डावात 210 धावांवर गुंडाळला गेला. सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताला 13 धावांची आघाडी मिळाली आहे.

You might also like

Comments are closed.