छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): लातूर येथे 28 ते 30 मार्च 2023 दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरिय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी मुकुल मंदिर शाळेचा विदयार्थी विवेक शेळके याची छत्रपती संभाजीनगर संघात निवड झाली आहे.
या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष कमांडर अनिल सावे, उपाध्यक्ष गंगाधर गिरगावकर, सचिव संजय लेकूरवाळे, मुख्यध्यापक संजय चौधरी, सुरेश परदेशीं, तसेच आई मीना शेळके वडील भागीनाथ शेळके यांनी कौतुक अभिनंदन केले
तसेच खेळाडूला क्रीडाशिक्षक राहुल चव्हाण,रोशन मिश्रा यांचे मार्गदर्शन लाभले आहे,