नवी दिल्ली – पाच वेळा जागतिक विजेता विश्वनाथन आनंद भारतीय संघाचा प्रेरक ही भूमिका सांभाळणार आहे. एका तपानंतर बुद्धिबळ खेळाचे हँगझोऊ (चीन) येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुनरागमन होणार असून, पाच वेळा जागतिक विजेता आहे. तर आता विश्वनाथन आनंद भारतीय संघाचा प्रेरक ही भूमिका सांभाळणार आहे.
तर आशियाई क्रीडा स्पर्धा १० ते २५ सप्टेंबर या कालावधीत होणार असून, चार सुवर्णपदकांचे लक्ष्य ठेवत अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने आनंदची नियुक्ती केली असून, पुढील आठवडय़ात गुरुवारी आनंद खेळाडूंसमवेत पहिल्या सत्रात मार्गदर्शन करणार आहे. २०१०मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने दोन कांस्यपदके पटकावली होती.आणि आता रतीय संघाचा प्रेरक ही भूमिका सांभाळणार आहे.ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे.