नवी दिल्ली – करोना साथीच्या दडपणामुळे प्रो कबड्डी लीगचे साप्ताहिक वेळापत्रक जाहीर करण्याचे धोरण संयोजक मशाल स्पोर्ट्सने अमलात आणले आहे. तर दोन संघांमधील खेळाडूंना करोनाची लागण झाल्यामुळे मागील आठवडय़ात संयोजकांना प्रो कबड्डीचे वेळापत्रक बदलावे लागले होते. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील संपूर्ण वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. याच पार्श्वभूमीवर संयोजकांनी सावधगिरीचे धोरण स्वीकारत ३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या सप्ताहातील सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
बेंगळूरु : दबंग दिल्लीने शनिवारी प्रो कबड्डी लीगमध्ये गुजरात जायंट्सला ४१-२२ असे पराभूत केले आहे . दिल्लीकडून विजय मलिक (८ गुण) आणि संदीप नरवाल (६ गुण) यांनी चांगला खेळ केला. गुजरातच्या प्रदीप कुमारने (७ गुण) दिलेली झुंज अपयशी ठरली. दिल्लीचा हा १४ सामन्यांत आठवा विजय ठरला असून ४८ गुणांसह त्यांनी गुणतालिकेत अग्रस्थान मिळवले.