भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज मंगळवारपासून केपटाऊनमध्ये तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. यावेळी भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचण्याची संधी आहे. टीम इंडियाला आजपर्यंत दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. अशा स्थितीत त्यांना प्रथमच येथे कसोटी मालिका जिंकण्याची इतिहासिक संघी आहे. भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीने केपटाऊनमध्ये पुनरागमन केले आहे. त्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
विराट दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला होता. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने या मालिकेतील पहिला सामना ११३ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला होता.मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा ७ गडी राखून पराभव झाला.
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन पाहुयात –
भारत –विराट कोहली(कर्णधार) केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव
दक्षिण आफ्रिका – डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, कीगन पीटरसन, रुसी व्हॅन डर ड्यूसेन, टेम्बा बावुमा, काइल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को जानसेन, कगिसो रबाडा, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर, लुंगी एनगिडी