आंध्र युनिव्हर्सिटी, विशाखापटणम येथे होणाऱ्या 11 ते 15 जानेवारी 2022 दरम्यान जुनिअर राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडू,प्रशिक्षक, पंच संतोष चंद्रकांत आवचार यांची या स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. ही बातमीऔरंगाबाद जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे .
या निवडीबद्दल औरंगाबाद विभागाच्या क्रीडा महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव डॉ.प्रदीप तळवेलकर, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार्थी डॉ.उदय डोंगरे,एकनाथ साळुंके तसेच औरंगाबाद जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष दत्ता भाऊ पाथ्रीकर,उपाध्यक्ष डॉ.फुलचंद सलामपुरे,सचिव गोकुळ तांदळे, राकेश खैरनार,दीपक रुईकर,गणेश बेटूदे,अक्षय बिरादार, सागर रुपवते,सचिन बोर्डे, आदिनी अभिनंदन केले.