रायफल शुटींग रेंजचे भूमिपूजन

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते खेलो इंडिया जिल्हा केंद्राचेही केले उद्घाटन

औरंगाबाद(प्रतिनिधी);-उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रेरणेने व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून आणि ए.एम.पटेल इन्फ्रा प्रा. लि.चे भावेन अमीन यांच्या सहकार्याने तयार करण्यात येत असलेल्या विभागीय क्रीडा संकुल येथे 25/50 फायर शुटींग रेंजच्या कामाचे भूमिपूजन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते आज झाले. खेलो इंडिया जिल्हा केंद्राचेही त्यांनी उद्घाटन केले.

 

राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, उपसंचालक कार्यालय, क्रीडा व युवक सेवा, औरंगाबाद विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास उपसंचालक  उर्मिला मोराळे, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, कंत्राटदार प्रकाश पारवेकर, उद्योजक विवेक देशपांडे, वास्तूविशारद दिनेश नवनागे, गोकुळ तांदळे, सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी व क्रीडा संघटक यांची उपस्थिती होती.

रायफल शुटींग रेंजचे भूमिपूजन

विभागीय क्रीडा संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे सर्व सोयी सुविधांसहित शुटींग रेंज काम लवकरात लवकर पूर्ण करावे. याठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडावेत, यासाठी क्रीडा अधिकारी यांनी पुढाकार घ्यावा. सीएसआर निधीमधून 10 मीटर शूटींग रेंजमध्ये आवश्यक असलेली दुरूस्ती करून ते सरावासाठी उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी चव्हाण यांनी क्रीडा अधिकाऱ्यांना दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे यांनी केले
.

परिसर आणि वस्तीगृहांची पाहणी कार्यक्रमानंतर विभागीय क्रीडा संकुलातील सर्व सोयी सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केली. खेळाडूंना आवश्यक असणाऱ्या सर्व मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही जिल्हाधिकारी यांनी क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंना त्यांच्या वस्तीगृहाच्या पाहणीदरम्यान दिली. त्यांच्याशी संवाद साधताना चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाल्यानंतर त्याची निगा, स्वच्छतेला प्राधान्य खेळाडूंनी द्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी खेळाडूंना केले.

रायफल शुटींग रेंजचे भूमिपूजन

 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडा अधिकारी  लता लोंढे, पंडीत चव्हाण, जिल्हा शुटींग असोसिएशनचे शिरीष थत्ते यांच्यासह क्रीडा मार्गदर्शक सचिन पुरी, पूनम नवगिरे, स्वप्नील तांगडे यांच्यासह विभागीय क्रीडा संकुल समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

You might also like

Comments are closed.