औरंगबाद-महाराष्ट्र अम्युचर नेटबॉल असोसिएशन वतीने दसरा मैदान ,भंडारा येथे २६ व्या राष्ट्रीय सबज्युनियर नेटबॉल स्पर्धा करीता निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते . यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील खेळाडूसह विविध जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता यात औरंगाबाद जिल्ह्याचा अष्ठपैलू खेळाडू विक्रमसिंग संजय सिंग कायटे याने आपल्या उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करीत महाराष्ट्र राज्याच्या नेटबॉल संघात स्थान मिळविले . नेटबॉल फेडेरेशन ऑफ इंडिया च्या मान्यतेने नेटबॉल असोसिएशन ऑफ दिल्लीच्या वतीने दिनांक १७ ते २६ सप्टेंबर २०२१ या कालावधीत ममता मॉडर्ण सिनियर सेकंडरी स्कूल विकासपुरी दिल्ली येथे आयोजित ३६ व्या सब-ज्युनियर राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धा २०२०-२०२१ स्पर्धेसाठी विक्रमसिंग संजयसिंग कायटे याची महाराष्ट्र संघात निवड झाली असून राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीर दसरा मैदान भंडारा येथे १३ ते १७ सप्टे. २०२१ या कालावधीत होत आहे महाराष्ट्र संघ तिथूनच दिल्लीसाठी रवाना होणार आहे.
विक्रमसिंग संजयसिंग कायटे हा सम्यक पब्लिक स्कूल व ज्युनियर महाविद्यालयचा विद्यार्थी असून त्याने शालेय,राज्य स्पर्धेत जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.या खेळाडूला जिल्हा संघटनेचे सचिव तथा प्रशिक्षक सतीश इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल राज्य संघटनेचे अध्यक्ष बिपीनभाई कामदार व सचिव डॉ.ललित जिवाणी,श्याम देशमुख,जिल्हा संघटनेचे सुनिल डावकर,धर्मेंद्र काळे,रमेश प्रधान, सतीश इंगळे,सुरेश त्रिभुवन,दिलीप जाधव,हर्षवर्धन मगरे,जयवर्धन इंगळे,आकाश सरदार, सचिन दांडगे,संकेत बोन्गार्गे,अनिल मोटे,अजय राजपूत,अविनाश बडे ,आदींनी अभिंनदन करुन शुभेच्छा दिल्या.