औरंगाबाद (प्रतिनिधी): महानगरपालिका -व्हेरॉक इंजिनिअरिंग लि. द्वारा आयोजित व शंकर-पार्वती कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रा प्रा. लि. इंट्रेस हाऊजर, दिशा ग्रुप, नितीन बगाडिया अध्यक्ष क्रेडाई प्रायोजित एम्प्लॉईज T-20 क्रिकेट स्पर्धेत रविवारी
गरवारे क्रीडा संकुल येथील क्रीडांगणावर झालेल्या सामन्यात महावीतरण आणि कंबाईन बँर्कर्स या संघांनी आपापले सामने जिंकत पुढील फेरीत प्रवेश केला.
पहिल्या सामन्यात सार्वजनिक बांधकाम खाते संघ १७.५ षटकांत ९७ धावांवर बाद झाला. प्रत्युत्तरात महावितरण संघाने विजयी लक्ष्य १५.२ षटकांत २ गडी राखून साध्य केले. यात गणेश वसईकरने ३७, शैलेश सूर्यवंशीने २८, राहुल पाटीलने २६ धावा केल्या.
बांधकाम खाते संघातर्फे सचिन पाटीलने ३ गडी बाद केले.पंच म्हणून आशिष देशपांडे, गुणलेखन इब्राहिम सय्यद यांनी केले.
दुसऱ्या लढतीत कमबाईन बँकर्स संघाने महावितरण ब संघांचा ७ गडी राखून पराभव केला.महावितरण ब संघाने १३७ धावा केल्या.यात विजय नरवडेने ४७ मंगेश गोंदावलेने ३० धावा केल्या.इनायत सय्यदने ४ गडी बाद केले.तर हरमितसिंग रागी, निखिल मुरूमकर यांनी प्रत्येकी एकेक गडी बाद केला. कम्बाईन बँकर्सने ३ बाद १४१ धावा करत सामना जिंकला.यात अनुभवी मिलिंद पाटीलने ४८, कुणाल फलकने ४५, हरमितसिंग रागीने २४ धावा केल्या.
महावितरण ब संघातर्फे संजय बनकरने २, पांडुरंग धांडेने १गडी बाद केला.