औरंगाबाद (प्रतिनिधी): इंटरनॅशनल स्कूल स्पोर्ट फेडरेशनच्यावतीने, नॉर्मनडे, (फ्रान्स) येथे दि. १४ ते २२ मे २०२२ होणाऱ्या १६ ते १८ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी १९ व्या आंतरराष्ट्रीय जिम्नॅसियाड बहु-क्रीडा स्पर्धैसाठी, स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने शबनम शेख यांची भारतीय कुस्ती संघाची कोच म्हणून निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल शबनम शेख यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या स्पर्धेत देशाची कामगिरी उंचावेल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.