पाकिस्तानने आयसीसीच्या सामन्यांमध्ये पहिल्यांदाच विजय मिळविल्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी फटाके फोडण्यात आले. पाकिस्तानचा विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. याचा सोशल मीडियावर चांगलाच विरोध करण्यात आला. तसेच देशातील जम्मू-काश्मीर उत्तर प्रदेश अशा अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली. जल्लोष करणार्यांना मारहाण करण्यात आली. या कारवाईवर नाराजीचा सूर उमटत आहे.अशाच महाविकासआघाडी मधील ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी तुम्ही विराट कोहलीला अटक करणार का असा प्रश्न उपस्थित केला आहे.
रविवारी पाकिस्तान आणि भारत यांच्यात सामना खेळला गेला.या सामन्यात दहा गड्यांनी भारताला पराभूत व्हावे लागले. भारताच्या प्रभावाचा अनेक ठिकाणी फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. याचे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ चांगलेच व्हायरल झालेले. यानंतर पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या नागरिकांवर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई करण्यात येत आहे.
पीडीपीए प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणारे विद्यार्थी विरुद्ध यूएपीए अंतर्गत केलेल्या कारवाईचा निषेध केला. यात महाविकासआघाडी तील ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही उडी घेतली आहे.त्यांनी कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानी खेळाडूंचे कौतुक केल्याने यूएपीए अंतर्गत अटक करणार का असा प्रश्न उपस्थित केला. मिठी दिल्याचा फोटो व्हायरल.पाकिस्तानी विजय मिळाल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिजवानला मिठी मारली होती. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.खेळाडूंमध्ये मैत्रीपूर्ण संबंध पाहून अनेकांनी कौतुक केले होते. मात्र देशात यूएपीए अंतर्गत होत असलेल्या कारवाईमुळे विराट कोहली लाच अटक करणार का? असा प्रश्न नितीन राऊत यांनी उपस्थित केला