पोलांड येथील वो्स्लाव येथे सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या आय एस एस एफ प्रेसिडेंट कप स्पर्धेत भारतीय नेमबाज राही सरनोबतने रौप्य पदकाची कमाई केली आहे. 25 मीटर पिस्टल प्रकारात राहीने 31 गुणांची कमाई केली. जर्मनीच्या वेन्नेकैम्प हिने 33 गुणासह सुवर्णपदक पटकावले. तर फ्रान्सच्या लैमोले हिला कांचे पदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीतील आठ स्पर्धकांमध्ये राही सोबत भारताची मनू भाकेरही होती. तिला 17 गुणांसह सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
पोलंड येथे सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या आयएसएसएफ प्रेसिडेंट कप स्पर्धेत भारतीय नेमबाज राही सरनोबत ने रौप्यपदकाची कमाई केली. महिला गटातील 25 मीटर पिस्टल प्रकारात बंदूक खराब झाल्यानंतर ही राही सरनोबत ने लक्ष्य भेदल.
दुसरीकडे युवा नेमबाज मनू भाकेरणे वैयक्तिक प्रकारातील अपयश मिश्र गटात भरून काढले. 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र क्रीडा प्रकारात मनूने तुर्कीच्या ओजगूर च्या साथीने सुवर्णपदकाची कमाई केली. या जोडीने 9-7 असा विजय नोंदविला.