मुंबई: न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची टीम घोषणा करण्यात आली आहे. टी २० संघाचं कर्णधारपद रोहित शर्मा भूषविणार आहे. दरम्यान केएल राहुल उपकर्णधार असणार आहे. तर ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर. अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज यांची संघात निवड करण्यात आली आहे. तर विराट कोहलीला टी २० मालिकेसाठी आराम देण्यात आला आहे.
दरम्यान यावेळी मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला संघात स्थान देण्यात आले आहे. हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यासारख्या वरिष्ठ खेळाडूंना आराम दिला आहे. हर्षल पटेल, वेंकटेश अय्यार यांना संघात स्थान मिळेल, असं सांगण्यात येत आहे. हर्षल पटेलने आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. तर श्रेयस अय्यरचं संघात पुनरागमन झालं आहे. दीपक चाहर आणि युजवेंद्र चहल यांना संधी मिळाली आहे.
दरम्यान न्यूझीलंड टी २० वर्ल्डकप संपल्यानंतर थेट भारत दौऱ्यावर येणार आहे. जयपूर, रांची आणि कोलकाता येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी २० सामने असतील. तर कसोटी सामने कानपूर आणि मुंबई होणार आहेत.