जालना(प्रतिनीधी): शहरातील आझाद मैदानात आज राष्ट्रीय खेळ दिवस व मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त फ्रेंड्स फुटबॉल क्लब आणि निर्मल-रतन फुटबॉल क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने अंडर १४ वर्षीय मुले यांच्या साठी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात एकूण चाळीस संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत चार संघ बाद फेरी खेळले. यात फ्रेंड्स संघाने अंतिम सामन्यात निर्मल रतन फुटबॉल फाउंडेशनचा 2-0 ने विजय मिळवला.
या स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन जैस्वाल होते. प्रमुख पाहुणे कन्हैया भुरेवाल, राजेश निर्मल हे होते. या फुटबॉल स्पर्धेसाठी मंनेरवारलू युवा मंचाच्या वतीने दोन होतकरू गरजवंत खेळाडूंना फूटबॉल किट देण्यात आली. यावेळी युवा मंचचे अध्यक्ष अजय कामतिकर, शेरू कामतिकर, राजेश कुंडलकर, मनोज मामलेकर, विशाल रेड्डी अणि राहुल ताड़ेपकर आदींची उपस्थिती होती.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सचिन सावंत, प्रणय हस्तक, प्रणय अधेकर सोहेल, सचिन चेके यांनी परिश्रम घेतले.