जालना( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने २३ वर्षाखालील फ्री स्टाईल, ग्रीको रोमन मुले व मुली राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड चाचणी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा राष्ट्रीय तालीम संघातर्फे जिल्ह्याचा संघ निवडीसाठी मंगळवार, दिनांक ३१ ऑगस्ट रोजी शहरातील भक्त नगर रेवगाव रोड वरील गुरु रामचरण उस्ताद भक्त कुस्ती आखाड्यात निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या निवड चाचणी स्पर्धेसाठी जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल १७२ मल्लांनी सहभाग नोंदविला. विविध वजनगटात हि स्पर्धा खेळीमेळीच्या व चुरशीच्या लढतीमध्ये पार पडली.
तत्पूर्वी शहरातील जेष्ठ पैलवान व समाजसेवक मदनलाल भगत यांच्या हस्ते महाबली हनुमंत व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे संस्थापक अध्यक्ष स्व. चरण पैलवानजी भक्त यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व आखाडा पूजन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली .या निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत खालील विजयी मल्ल राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत.
विजयी खेळाडू खालीलप्रमाणे:
मुले फ्रीस्टाईल
५७ किलो रितेश नाईक ,६१ किलो मोहन सरकटे ,६५ किलो गणेश राठोड ,७० किलो शुभम भद्रे ,७४ किलो संदीप काटकर ,७९ किलो वैभव थोरवे ,८६ किलो निरंक, ९२ किलो सयाजी बाळराज ,९७ किलो अमोल राऊत ,१२५ किलो निरंक
मुले ग्रीकोरोमन
५५ किलो विश्वजित कुदळे, ६० किलो अर्जुन काळे ,६३ किलो शे. अर्शद ,६७ किलो सुवेद शिंदे ,७२ किलो संतोष येऊळ, ७७किलो निरंक , ८२ किलो शुभम गत्ते ,८७ किलो निरंक, ९७ किलो निरंक, १३० किलो निरंक
मुली
७२ किलो प्रियंका घुशींगे.
.यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.दयानंद भक्त, जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव सुपारकर, शिवसेना शहरप्रमुख डॉ.आत्मानंद भक्त, उपमहाराष्ट्र केसरी विलास डोईफोडे, शाहू पैलवान, विधिज्ञ मारोती आटोळे, विधिज्ञ योगेश खर्डेकर, सदानंद भक्त, मुकुंद लहाने, गौतम बाळराजआदी पदाधिकारी तसेच कुस्तीशौकिनांची उपस्थिती होती. स्पर्धेसाठी पंच म्हणून एन आय एस कुस्ती कोच प्रा.मंगेश डोंगरे, प्रा.डॉ.शाम काबुलीवाले, कमलेश सुपारकर यांनी काम पाहिले.