ठाणे जिल्हा युवागट कुस्ती चाचणी स्पर्धेत कोनगाव अव्वल

मुंबई(प्रतिनिधी) : ठाणे जिल्हा तालीम संघ व कला निकेतन मंडळ कोनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कोनगाव येथे कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे जिल्हा तालीम संघाच्या युवा गट निवड चाचणी फ्रीस्टाईल तसेच ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा कोनगावच्या कला निकेतन व्यायाम शाळेत उत्साहात पार पडल्या. २० वजनी गटातील सर्वाधिक ६ सुवर्णपदके पटकावून कोनगावने सांघिक विजेतेपदावर आपले नाव कोरले. विजयी खेळाडूंना मेडल, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धांचे उदघाटन कोनगावच्या सरपंच डॉ. रुपाली कराळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी कल्याण डोंबिवली महापालिका गटनेते वरुण पाटील, कोनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे, ऋतुजा पाटील, संपादक किशोर पाटील व ठाणे तालीम संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
उदघाटन प्रसंगी बोलताना वरुण पाटील म्हणाले की, कला निकेतन मंडळाचे अध्यक्ष विनोद पाटील, इतर मंडळाचे सदस्य व खेळाडूंनी माझ्याकडे आंतरराष्ट्रीयस्तरीय कुस्ती मॅट पाहिजे म्हणून पाठपुरावा केला होता. या महिन्याच्या अखेरपर्यंत आपणास कुस्ती मॅट देतो. आपल्या व्यायाम शाळेसाठी सोना बाथ व इतर आवश्यक त्या सुविधाही देण्यात येतील असे आश्वासन दिले. कोनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे म्हणाले की, मी स्वतः एक कुस्ती खेळाडू आहे. कुस्ती खेळात ऑलिंपिक मध्ये भारतीय खेळाडूंनी अनेक पदके मिळवली आहेत. टोकियो ऑलिंपिक मध्ये रवीकुमारने रौप्य तर बजरंग पुनियाने कास्य पदकाची कमाई केली आहे. ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंनी ऑलिंपिक मध्ये सुवर्णपदकावर नाव कोरले तर मला अत्यानंद होईल असे प्रतिपादन केले. महाराष्ट्र केसरी युवराज पाटील यांच्या कन्या तसेच पोलीस उप निरीक्षक ऋतुजा पाटील यांनी देखील उपस्थित खेळाडूंना उत्कृष्ट डावपेच करा. जिंकलात तर अभिनंदन परंतु हरलात तर अजुन मेहनत करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
४ व ५ सप्टेंबर रोजी पुण्यातील इंदापूर येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. आज येथील फ्री स्टाईल व ग्रीकोरोमन स्पर्धांमधुन विविध वजनी गटातील २० सुवर्णपदक विजेते खेळाडू राज्य स्तर स्पर्धांसाठी पात्र ठरले. खालील विजयी राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये हे पात्र खेळाडू ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.

ग्रीको रोमन स्पर्धा सुवर्ण पदक विजेते :-
५५ कि. सागर काळुराम भोईर, कोनगाव
६० कि. भावेश जनार्दन चौधरी, टेमघर
६३ कि. ऋषिकेश कचरु पाटील, गोवे
६७ कि. सागर कृष्णा डिंगोरे, गोवे
७२ कि. सुधीर जनार्दन पाटील, बुर्दूल
७७ कि. पंकज आप्पा माळी, एलकुंदे
८२ कि. मोहित बबन पाटील, कोनगाव
८७ कि. बाळू मुनीलाल यादव, गोवे
९७ कि. साहिल विजय पाटील, कोनगाव
१३० कि. मंगेश आकाश पाटील, रांजनोली

फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धा सुवर्ण पदक विजेते :-
५७ कि. अविष्कार कृष्णा मढवी, कोनगाव
६१ कि. प्रणय बाळाराम पाटील, कोनगाव
६५ कि. महेंद्र म्हात्रे, नाऱ्हेन
७० कि. मनीष विश्वास भोईर, नांदीठणे
७४ कि. प्रतिक भंडारी, चौधरपाडा
७९ कि. जय बाळाराम पाटील, कोनगाव
८६ कि. कल्पेश पाटील, बुर्दूल
९२ कि. धनंजय पाटील, साखरोली
९७ कि. आकाश म्हात्रे, पिंपळास
१२५ कि. सुजित हरड सोनाळे

ठाणे जिल्हा तालीम संघाचे पंच प्रा. श्रीराम पाटील, आंतरराष्ट्रीय पंच विकास पाटील, राष्ट्रीय पंच युवराज पाटील, सतीश म्हात्रे, राजेश कराळे, किसन भोईर, पंकज कराळे, विष्णू पाटील, श्रीराम धोंडळ, दीपक ठाकरे, डॉ. तपन पाटील, राजू चौधरी नरेंद्र पाटील, सोन्या पाटील मुकुंद व देवीदास पाटील यांनी पंच आणि तांत्रिक अधिकारी म्हणून काम पाहिले.या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ठाणे जिल्हा तालीम संघ व कोनगावच्या कलानिकेतन मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली. शेवटी सर्वांचे आभार ठाणे जिल्हा कुस्ती संघटक व राष्ट्रीय कुस्ती पंच श्रीराम पाटील यांनी मानले.

You might also like

Comments are closed.