जालना (प्रतिनिधी)-जालना जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनची नुकतेच नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये निलेश देशमाने अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी ओम प्रकाश गाडे यांची निवड करण्यात आली. तर सचिव म्हणून संतोष आडे आणि संदीप राठोड आणि प्राध्यापक गंगाराम राठोड यांना कमिटीमध्ये स्थान देण्यात आले. या सर्वांच्या निवडीचे जिल्हाभरातून स्वागत तसेच सत्कार कौतुक होत आहे.
यावेळी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेश देशमाने बोलतांना म्हणाले की आम्ही जिल्ह्याच्या क्रिकेटचा स्तर वाढविण्यास सर्वतोपरी प्रयत्न शील राहणार आहे. त्यासाठी वाटेल ती मदत पुरविण्याचा निर्धार केला. आणि म्हणाले की पीएमओ ऑफिस कडे आम्ही नवीन क्रीडा साहित्य, तसेच क्रीडांगण आणि रूम ची मागणी केली आहे.तसेच जिल्हाधिकारी कडून ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्याची ग्वाही पण देण्यात आली. अध्यक्ष देशमाने यांनी निवड बद्दल सर्वांचे आभार मानले.