यूगांडा पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल 2021;निलेश गायकवाड ला रौप्य पदक

औरंगाबाद (प्रतिनिधी)- कन्नड तालुक्यातील शिवराई गावचा जागतिक क्रमवारीत 24 व्या स्थानावर असलेल्या निलेश गायकवाड याने युगांडा येथे सुरू असलेल्या यूगांडा पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल 16-21 नोव्हेंबर 2021 या स्पर्धेत रौप्य पदक मिळवले. अंतिम फेरीत त्याचा भारताच्याच जागतिक क्रमवारीत 5 वा स्थानावर असेलल्या सूकांत कदम याने चुरशीच्या सामन्यात 21-16 17-21 21-10 असा पराभव केला.

निलेश ने या यशाचे श्रेय त्याचे वैयक्तिक कोच आणि भारतीय पॅरा बॅडमिंटन संघाचे राष्ट्रीय कोच द्रोणाचार्य अवॉर्ड विजेते गौरव खन्ना यांना दिले. त्याने सांगितले की लखनौ येथे लॉक डाऊन असतानाही गौरव सरांनी बाहेर गार्डन मधे माझी ट्रेनिंग चालू ठेवली तसेच या संपूर्ण स्पर्धेदरम्यान प्रत्येक मॅच मधे सरांचे मार्गदर्शन खूप महत्वाचे ठरले. तो मागील तीन वर्षापासून गौरव खन्ना एक्सेलीया अकॅडमी मधे ट्रेनिंग करत आहे.

तसेच त्याने या यशात त्याचे नाशिक चे प्रशिक्षक अमित देशपांडे व औरगाबाद चे प्रशिक्षक हिमांशू गोडबोले यांचेही योगदान अमूल्य असल्याचे सांगितले.यासोबत त्याने आपल्या परिवाराने नेहमी खेळण्यासाठी प्रोत्साहन व स्वातंत्र्य दिले यामुळेच आपण हे यश मिळवू शकलो असे सांगितले.या स्पर्धेतील चांगल्या कामगिरी मुळे तो जागतिक क्रमवारीत टॉप 15 मधे एंट्री करेल.त्याचे पुढील लक्ष हे पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप व एशियन गेम्स मधे सहभाग होण्यासाठी पात्र होण्याचे आहे.

You might also like

Comments are closed.