युगांडा पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दिव्यांग खेळाडू आरती पाटीलचे यश

पुणे  युगांडा पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दिव्यांग खेळाडू आरती पाटीलने महिला एकेरी मध्ये तृतीय क्रमांक पटकाविला. २३ डिसेंबर ते २७ डिसेबर दरम्यान भुवनेश्वर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. या यशाबद्दल पुणे शहर मनसे महिला आघाडीकडून शहराध्यक्ष सौ. वनिता वागसकर यांनी तिचे अभिनंदन केले. युगांडा स्पर्धेतील सहभागासाठी वागसकर यांनी दोन लाखाची आर्थिक मदत केली होती.

खेळाडूंना सक्रिय प्रोत्साहन देण्याची परंपरा मनसेचीच : वनिता वागसकर
महाराष्ट्राची क्रीडा संस्कृती बहरावी तसेच खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करावी याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या पुणे शहर अध्यक्षा वनिता वागसकर यांच्या माध्यमातून कु.आरती पाटील आंतरराष्ट्रीय दिव्यांग पॅरा बॅडमिंटन पटुस रु 2 लाखाची आर्थिक मदत करण्यात आली होती.

वनिता वागसकर म्हणाल्या, ‘खेळाडूना सक्रिय प्रोत्साहन देण्याची परंपरा मनसेची आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे कायमच कलाकार व खेळाडू यांच्या पाठीशी असतात. कु. आरती पाटील हिच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून ते पुढील वाटचालीस शुभेच्छा देणार आहेत’.

आरती पाटील यांची भेट मनसे महिला शहर अध्यक्ष सौ वनिता वागसकर यांच्या बरोबर ऑक्टोबरमध्ये भेट झाली. यावेळी आरती पाटील दिव्यांग पॅरा बॅडमिंटनपटूस तिचे प्रशिक्षक अजय रावळ, रोहित दीक्षित ,संदीप डांगे यांच्याशी सविस्तर चर्चा केली असता ती आतापर्यंत होत असलेल्या अनेक परदेशातील स्पर्धांना खेळातील गुणवत्ता असूनही आर्थिक परिस्थिती मुळे जाऊ शकलेली नाही.

तिला २०२४ साली होणाऱ्या पॅरा ऑलम्पिक स्पर्धाची तयारी करायची आहे. त्यासाठी तिला २०२४ सालापर्यंत विविध देशामध्ये होत असणाऱ्या स्पर्धामध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. त्याचा एक भाग म्हणून दि. ११ नोव्हेंबर २०२१ रोजी युगांडा येथे सहभागी होणे गरजेचे आहे. यासाठी तिला तत्काळ मदत म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला शहर अध्यक्षा सौ वनिता वागसकर यांच्या सहकार्यातून रीती फोर्ब्स यांच्या माध्यमातून रु 2 लाखाची मदत करण्यात आली. यापुढेही महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना कु. आरती पाटील हिच्या पाठीशी उभी राहणार, असे वनिता वागसकर म्हणाल्या.

याप्रसंगी संतोष पाटील (प्रसार माध्यम सचिव मनसे पुणे )विक्रांत भिलारे (विद्यापीठ उपाध्यक्ष मनसे पुणे )उपस्थित होते.

You might also like

Comments are closed.