आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने आपला दबदबा राखला आहे. आतापर्यंत 2000, 2008, 2012 आणि 2018 या वर्षी झालेल्या स्पर्धेत युवा टीम इंडियाने जेतेपद पटकावले होते. याशिवाय 2016 मध्ये युवा टीम इंडियाला उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
स्पर्धेतील भारतीय संघाचा सामना कधी अन् कुठे?
आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कप 2022 स्पर्धेत भारत 15 जानेवारी रोजी गुयानाच्या प्रोविडेंस स्टेडियमवर मैदानात उतरले. सलामीच्या लढतीत त्यांच्यासमोर दक्षिण आफ्रिका संघाचे आव्हान असेल. भारताचा दुसरा सामना त्रिनिदाद च्या ब्रायन लारा स्टेडियमवर 19 जानेवारीला ऑयर्लंड आणि याच मैदानात 22 जानेवारीला टीम इंडिया युगांडासोबत भिडेल.
सामन्याची वेळ काय?
वेस्टइंडीजमध्ये रंगलेल्या या स्पर्धेतील साखळी फेरीतील सर्व तीन लढती भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7:30 वाजता सुरु होतील. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याशिवाय स्पर्धेत इतर सामनेही याच वेळेत रंगणार आहेत.
लाइव्ह टेलिकास्ट कुठे पाहता येतील सामने?
आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कप 2022 स्पर्धेतील भारताचे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर वेगवेगळ्या भाषेत पाहता येतील.