दोन्ही हाताने गोलंदाजी करणाऱ्या पोरानं क्रिकेटमधील ‘गुलामगिरी’चं पितळ उघडं पाडलं
१९ वर्षाखालील वर्ल्डकमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व;

त्यामुळे बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग ही क्षेत्र मिळून क्रिकेट तयार होत असले, तरी क्रिकेट हा फलंदाजांचाच (Cricket is a Batsmen Game) खेळ झालाय. त्याला कारणीभूत आहेत क्रिकेटचे नियम .या नियमानुसार गोलंदाजाला जवळपास गुलामासारखीच वागणूक मिळत आहे. फ्लॅट खेळपट्ट्या, आत येत चाललेल्या बाऊंडरी लाईन यामुळे मॉडर्न क्रिकेटमध्ये गोलंदाजांचे काम अवघड होत चालले आहेत त्यामुळे गोलंदाजांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी नानाविध शक्कल लढवाव्या लागतात.
ऑस्ट्रेलियाच्या भारतीय वंशाच्या फिरकीपटूने फलंदाजांना गोंधळात टाकणारी क्लुप्ती शोधून काढली. निवतन राधाकृष्णन (Nivethan Radhakrishnan) असं या अतरंगी गोलंदाजाचं नाव आहे. तो सध्या १९ वर्षाखालील वर्ल्डकमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करतोय. राधाकृष्णन हा उजव्या हाताने ऑफ स्पिन गोलंदाजी आणि डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स गोलंदाजी करण्यात माहिर आहे.
Comments are closed.