‘यू मुंबा’ने दाखवला दम, दमदार पुनरागमनासह सामना केला टाय

'यू मुंबा'ने दाखवला दम, दमदार पुनरागमनासह 'हरियाणा स्टिलर्स'ला गाठत सामना केला टाय

प्रो कबड्डी लीग २०२१ला काही दिवसांपूर्वीच धमाक्यात सुरुवात झाली आहे. प्रो कबड्डीचा यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या चौदाव्या दिवशीचा पहिला सामना ‘हरियाणा स्टिलर्स’ आणि ‘यू मुंबा’ संघात झाला. हरियाणा आणि मुंबई संघातील या सामन्यात शेवटपर्यंत रोमांचक थरार पाहायला मिळाला. अखेर उभय संघातील हा सामना २४-२४ ने बरोबरीत सुटला आहे.

पहिल्या हाफमध्ये आघाडीवर असलेल्या हरियाणाशी मुंबईने केली बरोबरी

हरियाणा आणि मुंबई यांच्यात झालेल्या या सामन्यात पहिल्या हाफमध्ये हरियाणा मुंबईपेक्षा २ अंकांनी अर्थात १२-१० ने आघाडीवर होते. मात्र पुढे मुंबईच्या खेळाडूंनीही सामन्यात जोरदार पुनरागमन केले आणि सामन्याअंती २४-२४ ने हरियाणाशी बरोबरी करण्यात यश मिळवले आहे.

You might also like

Comments are closed.