तमिळ थलायवाजपुढे यूपी योद्धांची शरणागती

प्रो कबड्डी लीग २०२१ला काही दिवसांपूर्वीच धमाक्यात सुरुवात झाली आहे. प्रो कबड्डीचा यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या चौदाव्या दिवशीचा (०४ जानेवारी) दुसरा सामना ‘यूपी योद्धा’ आणि ‘तमिळ थलायवाज’ संघात झाला.

या हंगामात आतापर्यंत प्रत्येकी १ विजय मिळवलेले हे संघ आपल्या दुसऱ्या विजयासाठी झगडताना दिसले. या सामन्यातील पहिल्या हाफमध्ये चेन्नई संघाने दमदार खेळ दाखवत २१-१० ने मोठी आघाडी घेतली होती. पुढे यूपीने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते चेन्नईच्या मोठ्या आघाडीला पार करू शकले नाहीत. परिणामी ६ अंकांच्या फरकाने म्हणजेच ३९-३३ ने चेन्नईने हा सामना खिशात घातला. हा त्यांचा हंगामातील दुसरा विजय होता.

पहिला सामना सुटला बरोबरीत

तत्पूर्वी हरियाणा आणि मुंबई यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात पहिल्या हाफमध्ये हरियाणा मुंबईपेक्षा २ अंकांनी अर्थात १२-१० ने आघाडीवर होते. मात्र पुढे मुंबईच्या खेळाडूंनीही सामन्यात जोरदार पुनरागमन केले आणि सामन्याअंती २४-२४ ने हरियाणाशी बरोबरी करण्यात यश मिळवले आहे.

You might also like

Comments are closed.