औरंगाबाद (प्रतिनिधी ):विभागीय क्रीडा संकुल गारखेडा परिसर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे तीन दिवसांपासून जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदेंची चौकशी दरम्यान राजाराम दिंडे माजी तालुका क्रीडा अधिकारी हे देखील याप्रसंगी ठाण मांडून आहेत .दिंडे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचे निकटवर्तीय अधिकारी म्हणून ओळख आहे .चौकशी दरम्यान जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांना धारेवर धरून कागदपत्रांची मागणी का करत आहे ?
कोण आहे हे दिंडे ? केव्हापासून आहे विभागीय आयुक्त सुनील केंद्रे यांचे निकटवर्तीय
विश्वसनीय सूत्रांनुसार माजी तालुका क्रीडा अधिकारी दिंडे हे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर क्रीडा आयुक्त असताना त्यांच्या काळामध्ये खेलो इंडीया स्पर्धेचे आयोजन शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात आले होते या ठिकाणी स्पर्धा आयोजनाच्या काळामध्ये दिंडे यांना विभागीय क्रीडा अधिकारी सुनील केंद्रेकर यांचे निकटवर्तीय अधिकारी म्हणून ओळख होती . काही दिवसातच विभागीय आयुक्त पदाचा पदभार सुनील केंद्रेकर यांनी सांभाळल्यानंतर दिंडे यांना विभागीय क्रीडा संकुलाच्या सर्व कामाच्या नियोजनाकरिता नेमले होते .
या काळात दिंडे यांनी विभागीय क्रीडा संकुलामधे खेळण्याकरिता येणाऱ्या खेळाडूंना भरमसाठ शुल्कवाढ आणि संकुलाची भाडेवाढ करण्यासाठी आग्रहाची भूमिका असणारी व्यक्ती म्हणून ओळख आहे याविषयी संघटनांनी बोलतांना असे सांगितले की , मध्यमवर्गीय खेळाडू संकुलापासून व खेळापासून दुरावले आहे व खेळाचे व्यापारीकरण झाले आहे . खेळाचे व्यापारीकरण करण्यास कारणीभूत दिंडे यांना संबोधल्या जाते दिंडे यांनी दिलेले प्रस्ताव विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे नेहमी प्राधान्य देत असत.
दिंडे याठिकाणी येताच असे समोर येते कि विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी चौकशी दरम्यान काय चालू आहे आणि चौकशी मध्ये कविता नावंदेंना कितपत व कसे वाचवता येते याकरता शक्कल लढवत आहे . आता यामध्ये चौकशी अधिकारी आपला अहवाल कसा सदर करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे .
काय म्हणाले क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरीया
स्पोर्ट्स पॅनोरमाने क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरीया यांना प्रश्न विचारला की , राजाराम दिंडे माजी क्रीडा अधिकारी हे मे २०१९ रोजी सेवानिवृत्त झाले होते तरीही त्यांना चौकशीसाठी का बोलवण्यात आले हि चौकशी फक्त कविता नावंदे यांच्या कार्यकाळातील आहे नावंदेंची नियुक्ती हि सप्टेंबर २०२० मध्ये झाली असून दिंडे हे चौकशी दरम्यान जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांना धारेवर धरून कागदपत्रांची मागणी का करत आहे ? श्री. बकोरीया बोलताना म्हणाले कि चौकशी अधिकाऱ्यांना दिंडे यांना चौकशी दरम्यान बोलवण्याचा अधिकार आहे व चौकशी दरम्यान बोलवू शकतात चौकशी अधिकारी हे निपक्ष चौकशी करत आहेत .
तरी राज्य क्रीडा मंत्री सुनील केदार याप्रकरणी काय पाऊल उचलतात हे पाहणे अतिउत्सुक्तेचे ठरणार आहे.