राज्यस्तरीय सिनियर तायक्वांदो स्पर्धेत पुणे जिल्ह्याचे वर्चस्व!!

पालघर(प्रतिनिधी): पालघर येथे पार पडलेल्या ३३ व्या महाराष्ट्र राज्य सीनियर तायक्वांदो स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील खेळाडूंनी सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकण्याची कामगिरी केली. अहमदनगर , जळगाव, सांगली, मुंबई,
ऊपनगर, धुळे या जिल्ह्यातील खेळाडूंनीही सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले. स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद मुंबई संघाला प्रदान करण्यात आले.
दिनांक २,३ व ४ डिसेंबर २०२१ दरम्यान तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने पालघर तायक्वांदो असोसिएशन आयोजित ३३ वी महाराष्ट्र राज्य सीनियर तायक्वांदो स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे उदघाटन बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेश ठाकूर यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी व्यासपीठावर राज्य संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल झोडगे, महासचिव संदीप ओंबासे, सचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे , तांत्रिक समितीचे चेअरमन प्रवीण बोरसे, सुभाष पाटील, भास्कर करकेरा, गफार पठाण, वेंकटेश कररा, धुलीचंद मेश्राम, सुरेश चौधरी, सोबतच पालघर तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष अजित चाको व सचिव राजा मकवाना यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अविनाश बारगजे यांनी केले. पहिल्या दिवशी पुमसे प्रकारामध्ये सर्वाधिक सुवर्णपदकासह मुंबई संघाने प्रथम स्थान मिळवले,यजमान पालघर संघाला द्वितीय पर मुंबई उपनगरला तिसरे स्थान मिळाले. क्योरोगी (फाईट) प्रकारांमध्ये सर्वाधिक पदकांसह पुणे जिल्ह्याने विजेतेपद पटकावले. मुंबई संघाला उपविजेतेपद तर सांगली जिल्ह्याला तिसरे स्थान मिळाले. अहमदनगर, जळगाव, धुळे रायगड व ठाणे या जिल्ह्यातील खेळाडूंनीही सुवर्णपदके जिंकली. या जिल्ह्यांच्या पाठोपाठ बीड, सातारा, औरंगाबाद, नागपूर, रायगड या जिल्ह्यातील खेळाडूंनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली.

पदक विजेत्या खेळाडूंना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे महासचिव संदीप ओंबासे, सचिव मिलिंद पठारे, उपाध्यक्ष दुलीचंद मेश्राम ,कोषाध्यक्ष डॉ.अविनाश बारगजे, सुरेश चौधरी, भास्कर करकेरा, दुलीचंद मेश्राम, राहुल वाघमारे, दिव्या मकवाना, शिवराम मकवाना, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रशिक्षक नितीन खत्री, शिवछत्रपती पुरस्कार विजेता खेळाडू महेंद्र गोकुळे, विशाल सुतार आदी खेळाडूंच्या हस्ते पदके वितरण करण्यात आली. स्पर्धा चेअरमन अनिल (आबा) झोडगे, महासचिव संदिप ओंबासे, छत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे ,सुभाष पाटील, अविनाश बारगजे, दुलीचंद मेश्राम गफार पठाण या तांत्रिक समितीच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
ऐतिहासिक तायक्वांदो स्पर्धा..
या स्पर्धेत ३४ जिल्हे व महाराष्ट्र पोलीस अशा एकूण ३५ संघांनी सहभाग नोंदवला. तायक्वांदो खेळात सर्वाधिक जिल्ह्यांच्या सहभाग असणारी ही इतिहासातील पहिली राज्य स्पर्धा ठरली. महाराष्ट्रात प्रथमच “सेंसर सिस्टम” वर अत्याधुनिक पद्धतीने या स्पर्धा घेण्यात आल्या. खेळाडूंसाठी हा एक वेगळा व आनंददायी अनुभव होता. इंडिया तायक्वांदोचे चेअरमन नामदेव शिरगावकर यांनी तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र च्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन निर्विवादपणे कुठल्याही वादाशिवाय अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली.

राज्यस्तरीय स्पर्धे मधील सुवर्णपदक विजेते मुले आणि मुली खालीलप्रमाणे
मुले :-
निलेश पाटील – जळगाव, नीरज चौधरी – धुळे,
शिवम शेट्टी – पुणे,
श्रीतेज झगडे – पुणे, सुरज चव्हाण – पुणे,
विशाल लामखडे – पुणे, गौरव कुडले – पुणे, गौरव भट – सांगली,

मुली :-
मृणाल वैद्य – पुणे, निशिता कोतवाल – पुणे, शिवानी भिलारे – पुणे, स्वप्नाली घेमुंड – अहमदनगर,
स्वप्नाली शिंदे – अहमदनगर,
रुचिका भावे – पुणे, श्रेया जाधव – मुंबई, ऐश्वर्या रावडे – पुणे

You might also like

Comments are closed.