दुबई- आयपीएल मध्ये क्वालिफायर दोन खेळवला जाणार आहे. तर यामध्ये कोलकाता समोर दिल्लीचे आव्हान होते. यामध्ये ेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात कोलकाता ने दिल्लीचा तीन विकेट्सनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश. आता कोलकाता चा अजिंक्य पदासाठी 15 तारखेला साठी चेन्नईची सामना होणार आहे.
नाणेफेक जिंकून कोलकाता ने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गोलंदाजांनी केलेल्या शानदार गोलंदाजीच्या बळावर दिल्ली फक्त 135 धावांपर्यंतच मजल मारू शकली. दिल्लीकडून शिखर धवन सर्वाधिक 36 तर श्रेयस अय्यरने नाबाद 32 धावांचे योगदान दिले. कोलकाता कडून चक्रवती ने सर्वाधिक दोन गडी बाद केले. धावांचा पाठलाग करीत असताना कोलकाताच्या सलामीवीरांनी संघाला जोरदार सलामी करून दिली.
एक वेळ वन साइड सामना कलकत्ता जिंकणार पण दिल्लीच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करून वापसी केली. शेवटच्या दोन चेंडूवर सहा धावांची आवश्यकता असताना राहुल त्रिपाठी ने षटकार खेचत संघाला अंतिम फेरीत पोहोचवले.
कोलकाता कडून व्यंकटेश अय्यरने 55 तर शुभमन गिल ने 46 धावांचे योगदान दिले. दिल्लीकडून ऐनरीच ने सर्वाधिक दोन गडी बाद केले. मध्य फडीत कोलकात्याचे तब्बल पाच फलंदाज खाताही उघडू शकले नाही.