पालघरच्या मराठमोळ्या शार्दुल ठाकूरला टी-20 वर्ल्डकप संघात स्थान मिळाले आहे.सध्या शार्दुल आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्स कडून खेळत आहे.दिल्ली कॅपिटल्स च्या अक्षर पटेल च्या जागी त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
निवड समितीने संघ व्यवस्थापन सोबत चर्चा केल्यानंतर शार्दुल चा भारतीय संघात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.पंधरा सदस्यीय संघाचा भाग असलेला अष्टपैलू अक्षर पटेलचा आता स्टैंड बाय खेळाडूंमध्ये समावेश झाला आहे. बीसीसीआयने स्टेटमेंट मधून ही माहिती दिली आहे.
मोर्चा पालघर जिल्ह्यातील असलेल्या शार्दुल ठाकूरने आपल्या दमदार कामगिरीच्या बळावर भारतीय संघात स्थान मिळवले आहे. शार्दुल ने अनेकदा मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवले आहे. गोलंदाजी बरोबर तो उपयुक्त फलंदाजी सुद्धा करतो. फलंदाजीच्या बळावर सुद्धा त्याने काही सामने जिंकून दिले आहेत. कर्णधाराने त्याच्यावर ठेवलेला विश्वास त्याने प्रत्येक वेळी सार्थ करून दाखवला आहे. सध्या तो सीएसके च्या गोलंदाजीचा भार वाहत आहे.
भारतीय संघ पुढीलप्रमाणे-रोहित शर्मा,के एल राहुल,विराट कोहली, सुर्यकुमार यादव,ऋषभ पंत, रीपल ईशान किशन,हार्दिक पांड्या,रवींद्र जडेजा,राहुल चहर,आर अश्विन, शार्दुल ठाकूर,वरून चक्रवती, जसप्रीत बुमराह,भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.