दुबई-टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला 17 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. यूएई मध्ये आता आयपीएल च्या शेवटच्या टप्प्यातील सामने सुरू आहे. हे सामने संपल्यानंतर विश्वचषकाच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. यंदाच्या टी-20 विश्वचषकाच्या यजमानपद भारताकडे आहे,पण असे असले तरी कोरोणाच्या भीतीपोटी ही स्पर्धा भारताबाहेर युएई आणि ओमानमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या खास नव्या जर्सी चे ट्विटरवरुन अनावरण करण्यात आले.
भारतीय संघाची जर्सी आज फोटोच्या रूपाने दाखवण्यात आली. भारतीय संघातील काही खेळाडूंच्या नव्या जर्सीतील एक फोटो बीसीसीआयने पोस्ट केला. त्यानंतर आज चक्क दुबईच्या बुर्ज खलिफा या प्रसिद्ध उंच इमारतीवर भारताची जर्सी दाखवण्यात आली. बुर्ज खलिफा वर एखादी गोष्ट दिसणे हा अभिमानाचा क्षण असतो. त्यामुळेच, बुर्ज खलिफा पावर टीम इंडियाची जर्सी दिसणं हा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे.