अनिकेत जाधव ची यूएई मध्ये होणाऱ्या आशियाई फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड.

कोल्हापूर (प्रतिनिधी)-कोल्हापूरचा प्रतिभावंत फुटबॉलपटू अनिकेत जाधव यांची ते 23 वर्षाखालील भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. संयुक्त अरब अमिराती ध्ये 23 ते 31 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी(AFC U-23 ASIAN CUP) अनिकेत ची निवड करण्यात आली आहे.
भारतीय संघात निवड होणारा अनिकेत हा कोल्हापुरातील पहिलाच फुटबॉलपटू आहे. अनिकेत जाधव च्या निवडीने कोल्हापूरच्या फुटबॉल परंपरेत मानाचा तुरा रोवला आहे.
23 वर्षाखालील भारतीय संघ एएफसी अंडर 23 आशियाई चषक उज्बेकिस्तान 2022 साठी त्याच्या पात्रता मोहिमेला सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. 25 ते 31 ऑक्टोबर दरम्यान संयुक्त अरब अमिराती च्या फूजैराह येथील फूजैरा स्टेडियमवर सामने होणार आहेत.
भारतीय संघ 17 ऑक्टोबर रोजी बंगलोरमध्ये एकत्र येईल. त्यानंतर संघ 20 ऑक्टोबरला यूएई ला रवाना होईल.
Comments are closed.