दुबई-आयपीएल चा शेवट जवळ आला आहे. आज आयपीएल चा फायनल आहे, यामध्ये महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई समोर मौर्गनच्या कोलकाताचे आव्हान असणार आहे. यामध्ये चेन्नईने फाफ डु प्लेसिस च्या जोरदार खेडी च्या बळावर कोलकाता चा पराभव करून चौथ्यांदा आयपीएलच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. चेन्नई ने कोलकाता चा 27 धावांनी दणदणीत पराभव केला आहे. 86 धावा करणारा फाफ डू प्लेसेस या सामन्यात सामनावीर ठरला आहे. तर भारतासाठी आयपीएल चांगला ठरला आहे, ऑरेंज कॅप वर ऋतुराज गायकवाड तर पर्पल कॅप वर हर्षल पटेल ने कब्जा केला आहे.
नाणेफेक जिंकून कोलकाता ने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्यांचा हा निर्णय अंगलट पडला. चेन्नईच्या सलामीवीरांनी जोरदार सुरूवात करून दिली. चांगल्या फॉर्मात असलेला मराठमोळा सलामीवीर ऋतुराज गायकवाड 32 धावांवर बाद झाला. फाफ दुपलेसिस ने सर्वाधिक 86 धावा केल्या. मोइन अली रॉबिन उथप्पा नेही प्रत्येकी 31 व 37 धावांचे योगदान दिले. तर कोलकाता कडून नारायणने दोन गडी बाद केले. चेन्नईने 20 षटकात 192 धावांचा डोंगर उभा केला. धावांचा पाठलाग करीत असताना कोलकाता ची ही सुरुवात चांगली झाली. सलामीवीरांनी 90 धावांची सलामी करून दिली. मात्र त्यानंतर मध्यफळीत फलंदाज ‘तू चल मै आया’ याप्रमाणे खेळले. तब्बल सात फलंदाज कोलकाता चे दुहेरी आकडा पार करू शकले नाही. यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सलामीवीर व्यंकटेश अय्यर व शुभमन गिल ने प्रत्येकी एक्कावन व पन्नास धावा केल्या. चेन्नई कडून ठाकूरने सर्वाधिक 3 तर जडेजा व हेजल वूडणे प्रत्येकी दोन गडी बाद केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतलेल्या महेंद्रसिंग धोनीने आयपीएलचे विजेतेपद पटकावून दाखवून दिले आहे की तोच विश्वातील सर्वोत्तम कर्णधार आहे.