औरंगाबाद(प्रतिनिधी)- जिल्हा स्क्वॅश रॅकेट असोसिएशनच्या १७ नोव्हेंबर २०२१ रोजी जिल्हा स्क्वॅश ज्युनिअर व महिला पुरुष संघाची निवड चाचणी विभागीय क्रीडा संकुल गारखेडा परिसर येथे आयोजित करण्यात आली होती. याकरिता विविध ठिकाणांहून स्क्वॅश खेळाचे खेळाडू निवड चाचणीपूर्वी कोर्टवर खेळत असतांना एक अज्ञात व्यक्ती आला त्याने स्वतःचे नाव प्रशांत साठे आणि मी पत्रकार आहे असे सांगून सर्व खेळाडूंना नाव आणि पत्ता विचारून मोबाईलमध्ये शुटींग आणि फोटो काढत खेळाडूंना धमकावले कि तुम्ही येथे का खेळत आहात मी तुमची तक्रार मुख्यमंत्री ,क्रीडा आयुक्त ,पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे
तसेच अमरावती येथे होणाऱ्या स्पर्धा खेळण्यास जाऊ नका मी तेथे जाऊन स्पर्धा थांबवणार आहे तुम्ही मला माझ्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा नाहीतर तुमचे जीवन उध्वस्त होईल तुमच्या वरती विविध गुन्हे दाखल करण्यात येतील असे म्हणत धमकावले. तुम्हाला यातून वाचायचे असेल तर मला संपर्क साधावा असे प्रशांत साठे यांनी विद्यार्थ्यांना धमकावले. याची रीतसर तक्रार विद्यार्थ्यांनी क्रीडा उपसंचालक उर्मिला मोराळे यांना दिली.

याविषयी प्रशांत साठे यांना स्पोर्ट्स पॅनोरमाने संपर्क साधला असता तुम्हाला” मी याविषयी प्रतिक्रिया देणार नाही तुम्हाला जे छापायचे आहे ते छापा मी तुमच्या विरुद्ध पोलीस आयुक्तालयात तक्रार करून गुन्हा दाखल करेन “.
whatsapp वर खालीलप्रमाणे धमकी संदेश पाठवण्यात आला .

याविषयी स्पोर्ट्स पॅनोरमाने राज्य संघटना अध्यक्ष प्रदीप खांड्रे यांना संपर्क केला असता ते म्हणाले कि “मला हि प्रशांत साठे हि व्यक्ती बऱ्याच दिवसापासून ब्लॅकमेल करत होती. साठे विरुद्ध रीतसर तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे.यामुळे स्क्वॅशच्या खेळाडूंमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे तरी सर्व खेळाडूंनी आणि प्रत्येक जिल्हा संघटनेनी प्रशांत साठे याच्या विरुद्ध रीतसर पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी व त्याला न घाबरता आपल्या खेळाकडे लक्ष केंद्रित करावे . राज्य संघटना आपल्या सोबत आहे”
प्रशांत साठे विरुद्ध केलेली रीतसर तक्रार
तुमची खेळ संघटना बंद करुन तुम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो’ असे म्हणत क्रीडा संघटनेच्या अध्यक्षाला धमकी दिल्याचा प्रकार घडला. ही घटना २७ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी चार वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने पोलिसांत धाव घेत फिर्याद दिल्याने एकाविरोधात छावणी पोलिसांत एनसी दाखल करण्यात आली आहे. प्रशांत साठे (रा. बापूनगर) असे त्या धमकी देणाऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे.यासंदर्भात प्रदीप खांड्रे (३९, रा. संगीता कॉलनी, नंदनवन कॉलनी) यांनी फिर्याद दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस नाईक धात्रक करत आहेत.