‘CSK’ फॅन्सला जोर का झटका! IPLला अवघे २ दिवस बाकी असताना धोनीने सोडले चेन्नईचे कर्णधारपद

चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आयपीएलला अवघे दोन दिवस शिल्लक असताना कर्णधार महेंद्रसिंग याने चेन्नई संघाच्या कर्णधार पदाची धूरा दुसऱ्या खेळाडूकडे सोपवली आहे. प्राप्त माहितीनुसार चेन्नई संघ व्यवस्थापनाने पुर्वनियोजीत धोरणानुसारच हा बदल केला आहे.

महेंद्रसिंग धोनी यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या ताप्यात सर्वात जुणी, अनुभवी आणि विश्वासू असणारा तसेच रिटेन्शन प्रक्रियेत चेन्नई संघाचा  पहिली पसंती राहिलेल्या अष्टपैलू रविंद्र जडेजा याच्याकडे चेन्नई संघाची धूरा सोपावण्यात आली आहे. जडेजा हा संघासाठी महत्वाचा खेळाडू असला तरीही चेन्नई संघाच्या चाहत्यांना धोनी कर्णधारपदी नसणार, याबद्दल दुःख वाटत असणार, हे वेगळे सांगायला नको.

धोनीची कर्णधार म्हणून शानदार कामगिरी
धोनीने आयपीएलमध्ये २००८ पासून २०२१ पर्यंत एकूण १३ हंगामात नेतृत्त्व केले आहे. यात तो केवळ २०१७ साली आयपीएलमध्ये केवळ खेळाडू म्हणून खेळला. तसेच त्याने २००८ ते २०१५ आणि २०१८ ते २०२१ यादरम्यान चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्त्व करताना तब्बल ९ वेळा संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहचवले, तर चार वेळा विजेतेपद जिंकून दिले आहे. तसेच त्याने २०१६ मध्ये रायझिंग पुण सुपर जायंट्सचे नेतृत्त्व केले.

धोनीने एकूण २०४ आयपीएल सामन्यांमध्ये नेतृत्व केले असून यातील १२१ सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे तो आयपीएलमध्ये १०० किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांत विजय मिळवणारा पहिला कर्णधार आहे. इतकेच नाही, तर तो २०० हून अधिक आयपीएल सामन्यांत नेतृत्त्व करणारा देखील एकमेव कर्णधार आहे. त्याने ११६ सामने चेन्नईचे नेतृत्व करताना जिंकले आहेत. तर ५ सामने पुण्याचे नेतृत्व करताना जिंकले आहेत.

सीएसकेची पहिली निवड होता रविंद्र जडेजा
सीएसकेने आयपीएल २०२२ साठी लिलावाआधी ४ खेळाडूंना संघात कायम केले आहे. यामध्ये एमएस धोनीबरोबर रविंद्र जडेजा आणि मागील हंगामात संघाला ट्रॉफी जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ऋतुराज गायकवाड या भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तसेच परदेशी खेळाडूच्या रूपात सीएसकेने मोईन अलीला संघात कायम केले आहे.

या खेळाडूंची निवड करताना सर्वप्रथम सीएसकेने जडेजाला निवडले होते. त्याच्यासाठी सीएसकेने १६ कोटी रुपये मोजले आहेत. त्यानंतर चेन्नईने धोनी, मोईन अली आणि ऋतुराज यांची निवड केली होती. त्यांच्यासाठी अनुक्रमे १२ कोटी, ८ कोटी आणि ६ कोटी रुपये मोजले आहेत.

रविंद्र जडेजाची कामगिरी
रविंद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्सचा महत्त्वाचा भाग आहे. त्याला २०१२ साली चेन्नईने लिलावातून खरेदी केले होते. त्यावेळी तो सर्वात महागडा खेळाडूही ठरला होता. त्याने २०१२ ते २०१५ पर्यंत चेन्नईचे प्रतिनिधित्त्व केले. त्यानंतर तो चेन्नईवर बंदी आल्याने तो २०१६ आणि २०१७ साली गुजरात लायन्सकडून खेळला. पण, चेन्नईने २०१८ साली आयपीएलमध्ये पुनरागमन केल्यानंतर त्याला पुन्हा संघात स्थान दिले. तेव्हापासून जडेजा चेन्नई संघात आहे.

जडेजाने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये २०० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २३८६ धावा केल्या असून त्याच्या २ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने १२७ विकेट्सही घेतल्या आहेत.

You might also like

Comments are closed.