औरंगाबाद (प्रतिनिधी):आयएमए औरंगाबादतर्फे डॉक्टरांसाठी कोरोनाच्या तणावातून मुक्त होण्यासाठी आणि महिलांनी मानसिक व शारीरिक दृष्ट्या मजबूत राहण्यासाठी “स्पोर्ट्स कार्निवल’ चे आयोजन करण्यात आले होते.
प्रथमच महिला डॉक्टरांसाठी देखील क्रिकेट सामने खेळले. चार संघात ३६ महिला डॉक्टर सहभागी झाल्या होत्या. डॉ. वंदना काबरा यांच्या नेतृत्वाखाली रेड वॉरियर्स संघाने विजेतेपद पटकावले.
पर्पल कॉन्करर्स संघ उपविजेता ठरला. स्पर्धेत डॉ. सोनाली सावजी सर्वोत्कृष्ट फलंदाज, डॉ. किरण मंुदडा सर्वोत्कृष्ट गोलंदाज, डॉ. पूनम लोमटे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, डॉ. वंदना काबरा यांना मालिकावीर पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आयएमएचे अध्यक्ष डॉ. संतोष रंजलकर, स्पोर्ट्स सेक्रेटरी डॉ. प्रफ्फुल जटाळे, डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ. सुनील देशमुख, डॉ. अक्षय मारावार यांनी विशेष परिश्रम घेतली.