साताऱ्यात आजपासून रंगणार ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

सातारा | ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या साताऱ्यात यंदाची मानाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ५ एप्रिलपासून रंगणार आहे. ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडिअमवर होणार आहे. विशेष म्हणजे, तब्बल ५९ वर्षांनी या स्पर्धेचा मान सातारा जिल्ह्याला मिळाला आहे. या स्पर्धेचा थरार १९६३ साली साताऱ्यात रंगला होता. यंदाच्या स्पर्धेत तब्बल ९०० मल्लांचा सहभाग असणार आहे. हे मल्ल ३६ जिल्ह्यातील ४५ संघातील असणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे. ही स्पर्धा तब्बल ५५ हजार प्रेक्षकांना स्टेडियममधून लाईव्ह पाहता येणार आहे.

छत्रपती शाहू स्टेडिअमवर पार पडणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी ५ आखाडे सज्ज झाले आहेत. यात २ आखाडे मातीचे आणि ३ आखाडे मॅटचे असणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना ९ एप्रिलला होणार आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पटकावण्यासाठी मल्लांना ६ ते ८ इतर मल्लांना चितपट करावे लागणार आहे.

स्पर्धेविषयी थोडक्यात
मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला १९६१ साली सुरुवात झाली होती. यंदाचे हे या स्पर्धेचे ६४वे वर्ष आहे. विशेष म्हणजे, २०२० सालानंतर ही स्पर्धा कोरोना व्हायरसमुळे झाली नव्हती. त्यावेळी ही स्पर्धा जिंकण्याचा मान नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने पटकावला होता. त्याने लातूरच्या शैलेश शेळकेला नमवत मानाची चांदीची गदा जिंकली होती. त्याने शैलेशचा ३-२ असा पराभव केला होता.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची आजपर्यंतची ठिकाणे व विजेते

१९५३- पुणे
१९५५- मुंबई- स्पर्धा रद्द
१९५९- सोलापूर-
१९६०- नागपुर- अनिर्णित
१९६१- औरंगाबाद- दिनकर दह्यारी
१९६२- धुळे- भगवान मोरे
१९६३- सातारा- स्पर्धा रद्द
१९६४- अमरावती- गणपत खेडकर
१९६५- नाशिक- गणपत खेडकर
१९६६- जळगाव- दिनानाथ सिंह
१९६७- खामगाव, बुलढाणा- चंबा मुतनाळ
१९६८- अहमदनगर- चंबा मुतनाळ
१९६९- लातूर- हरिश्चंद्र बिराजदार
१९७०- पुणे- दादू चौगुले
१९७१- अलिबाग, रायगड- दादू चौगुले
१९७२- कोल्हापूर- लक्ष्मण वडार
१९७३- अकोला- लक्ष्मण वडार
१९७४- ठाणे- युवराज पाटील
१९७५- चंद्रपूर- रघुनाथ पवार
१९७६- अकलूज, सोलापूर- हिरामण बनकर
१९७७- चाळीसगाव, जळगाव- अनिर्णित
१९७८- मुंबई- आप्पासाहेब कदम
१९७९- नाशिक- शिवाजीराव पाचपुते
१९८०- खोपोली, रायगड- इस्माईल शेख
१९८१- नागपुर- बापू लोखंडे
१९८२- बीड- संभाजी पाटील
१९८३- पुणे- सरदार खुशहाल
१९८४- सांगली- नामदेव मोळे
१९८५- पिंपरी चिंचवड, पुणे- विष्णु जोशीलकर
१९८६- सोलापूर- गुलाब बर्डे
१९८७- नागपुर- तानाजी बनकर
१९८८- अहमदनगर- रावसाहेब मगर
१९८९- वर्धा- अनिर्णित
१९९०- कोल्हापूर- अनिर्णित
१९९१- अमरावती- अनिर्णित
१९९२- पुणे- आप्पालाल शेख
१९९३- बालेवाडी, पुणे- उदयराज जाधव
१९९४- अकोला- संजय पाटील
१९९५- नाशिक- शिवाजी केकान
१९९६- स्पर्धा रद्द
१९९७- देवळी, वर्धा- अशोक शिर्के
१९९८- नागपुर- गोरखनाथ सरक
१९९९- पुणे-  धनाजी फडतरे
२०००- खामगाव, बुलढाणा- विनोद चौगुले
२००१- नांदेड- राहुल काळभोर
२००२- जालना- मुन्नालाल शेख
२००३- यवतमाळ- दत्तात्रय गायकवाड
२००४- वाशी- चंद्रहास निमगिरे
२००५- इंदापूर, पुणे- सईद चाउस
२००६- बारामती, पुणे- अमोल बुचडे
२००७- औरंगाबाद- चंद्रहार पाटील
२००८- सांगली- चंद्रहार पाटील
२००९- सांगवी, पुणे- विकी बनकर
२०१०- रोहा, रायगड- समाधान घोडके
२०११- अकलूज, सोलापूर- नरसिंग यादव
२०१२- गोंदिया- नरसिंग यादव
२०१३- भोसरी- नरसिंग यादव
२०१४- अहमदनगर- विजय चौधरी
२०१५- नागपुर- विजय चौधरी
२०१६- वारजे, पुणे- विजय चौधरी
२०१७-भुगाव, पुणे- अभिजीत कटके
२०१८- जालना- बाला रफिक शेख
२०१९- बालेवाडी, पुणे- हर्षवर्धन सदगीर

You might also like

Comments are closed.