जालना (नाजीम मणियार ) – भारतात प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये भ्रष्टाचार हा होत असतो. तसेच काही भ्रष्टाचार पकडले जातात तर काही नाही पकडले जातात. याच प्रमाणे क्रीडा विभागातही अनेक प्रकारचे भ्रष्टाचार होत असतात मात्र याकडे दुर्लक्ष होत असते. मात्र या भ्रष्टाचाराचे चांगल्या खेळाडूंवर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. या भ्रष्टाचारामुळे त्यांना योग्य अनुदान न भेटल्यामुळे त्यांना योग्य प्रशिक्षण मिळत नसते. त्यामुळे हा भ्रष्टाचार लवकरात लवकर थांबवावा,अशी मागणी हॉकी असोसिएशन जालन्याचे सचिव प्रशांत नवगिरे यांनी केली आहे.
प्रशांत नवगिरे पुढे बोलताना म्हणाले की, शासनाने दिलेल्या व्यायामशाळा अनुदान, व क्रीडांगण अनुदान दलालामार्फत वाटपाचे केंद्र बनलेले आहे. त्यामुळे मलिदा लाटण्याच्या नादात जाण्याच्या खेड संस्कृतीकडे व खेळाडूंच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. अशा डेपोटेशनवर नेमणूक केलेल्या दलालांना बडतर्फ करून शासनाच्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी कारण हे दलाल अधिकाऱ्यांना सुरक्षा प्रदान करतात असा आरोप प्रशांत नवगिरे यांनी केला आहे.