औरंगाबाद- शिक्षक दिनानिमित्त खेळों मास्टर्स गेम्स असोसिएशन महाराष्ट्रची सर्वसाधारण सभा औरंगाबाद मध्ये पार पडली. या सभेत देवगिरी बँकेचे अध्यक्ष जलदूत किशोर शितोळे यांच्या हस्ते राज्याच्या विविध भागातून आलेल्या शिक्षक प्रतिनिधींचा गौरव व लोगोचे अनावरण करण्यात आले.
या प्रसंगी सभेला मार्गदर्शन करतांना जलदुत किशोर शितोळे यांनी महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या जिल्हा प्रतिनिधींचे कौतुक करत ते तीस वर्ष ते शंभर वर्ष पर्यंतच्या नागरिकांसाठी विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करून त्यांच्यासाठी आरोग्यमय जीवन जगण्याची शैली निर्माण करीत असल्यामुळे सर्व मास्टर गेम्स असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे व जिल्हा प्रतिनिधींचे अभिनंदन केले व येणाऱ्या काळात स्पर्धा आयोजनासाठी मदत करण्याचे हि आश्वासन दिले. ह्या वेळी खेळों मास्टर्स गेम्स असोसिएशन महाराष्ट्रचे सचिव अमन चौधरी, खजिनदार सुनील हामंद, असोसिएशन ऑफ वूमेन्स इन स्पोर्र्ट्सच्या सचिव डॉ.केजल भारसाखळे, महाराष्ट्र शारीरिक शिक्षण महासंघाचे सचिव प्रा.राजेंद्र खोतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
खेळों मास्टर्स गेम्स अंतर्गत ३० वर्षावरील ते १०० वर्षा पर्यंतच्या महिला व पुरुष खेळाडूंसाठी ॲथलेटिक्स, बास्केटबॉल, बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी, हँडबॉल, कबड्डी, लॉन टेनिस, नेट बॉल, स्विमिंग, रायफल शूटिंग, सुख बॉल, टेबल टेनिस, व्हाॅलीबॉल, वेटलिफ्टिंग, आणि कुस्ती या १६ खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात येतात. येणाऱ्या नोव्हेंबर मध्ये राष्ट्रीय मास्टर्सच्या स्पर्धा लखनौमध्ये होणार असल्यामुळे त्याआधी राज्यस्तरीय मास्टर्स गेम्सच्या स्पर्धा राज्य संघटनेच्या वतीने ऑक्टोबर मध्ये आयोजित करण्याचा निर्णय सभेमध्ये घेण्यात आला.
या सभेमध्ये बास्केटबॉलचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते स्विमीनाथन आर, प्रा.बाबासाहेब शेजवळ, सौ.रुतुजा यादव, शिवकुमार कोळ्ळे, शुभम देशपांड, पांडुरंग भगत,चंद्रकांत पाटिल, रामदास कुदळे, राजेश जाधव, निलेश खराटे यांची प्रमुख उपथिती होती.