जालना(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील जनता कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी संजीवनी शंकर इबितवार हिने देशपातळीवरील सोळा वर्ष वयोगटातील बॉक्सिंग स्पर्धेत सिल्वर पदक मिळवल्याने नेपाळ येथील काठमांडू येथे होणाऱ्या हाफ कीड बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सदर निवडीबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आले आहेत. गोवा येथे देशपातळीवरील सोळा वर्षे वयोगटातील बॉक्सिंग स्पर्धा नुकतीच झाली. यात तिने सिल्व्हर मेडल मिळवले.
ऑल इंडिया हाफ किडो बॉक्सिंग स्पर्धेचे अध्यक्ष यु नटराजन यांच्या स्वाक्षरीने तिला प्रमाणपत्र व रजत पदक देऊन गौरव केला. संजीवनी नायगाव ही बिलोली तालुक्यातील बडूर येथील असून तिला वडील नाहीत मात्र तिने अथक परिश्रम करून हे यश संपादन केले आहे.
गोवा येथील देश पातळीवरील स्पर्धेत यश मिळाल्यानंतर तिची नेपाली ते काठमांडू येथे होणाऱ्या बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली.
या यशाबद्दल एज्युकेशन सोसायटी नायगाव चे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी सदरील विद्यार्थी नीचे अभिनंदन करून अकरा हजार रुपयांचे पारितोषिक देऊन काठमांडू येथे होणाऱ्या बॉक्सिंग स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी एज्युकेशन सोसायटी नायगाव चे सचिव प्राध्यापक रवींद्र चव्हाण, जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य केजे सूर्यवंशी, क्रीडाशिक्षक यशवंतराव चव्हाण आदी उपस्थित होते.