श्रीलंकेविरुद्ध मायदेशात होणाऱ्या मालिकेसाठी भारताच्या कसोटी क्रिकेट संघाचेही कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे. मोहालीत १००वा कसोटी सामना खेळण्यासाठी अनुभवी फलंदाज विराट कोहली ट्वेन्टी-२० मालिकेतून विश्रांती घेऊ शकेल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
TEAM-
रोहित शर्मा (कप्तान), मयंक अग्रवाल, प्रियंक पंचाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन (फिटनेस पर निर्भर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उप-कप्तान), मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार
दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकांमध्ये खेळू न शकलेला अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतीतून सावरला असून, तो निवडीसाठी उपलब्ध आहे. रवीचंद्रन अश्विन, जडेजा आणि जयंत यादव या त्रिकुटावर फिरकीची मदार असेल.