जालना (प्रतिनिधी)-टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र राज्य महासचिव सौ. मीनाक्षी विलास गिरी मॅडम आणि पूर्ण टीम यांच्या अथक परिश्रमानंतर महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या परिश्रमाला फळ मिळाले आहेत.मागील वर्षी झालेल्या सिनीयर वयोगटातील राष्ट्रीय स्तरावर मुलींच्या टीमचे कॅप्टन दीपिका नायगावकर यांना टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करून आपल्या महाराष्ट्राचे नाव उंचावले. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून 25 हजार रुपयांची स्कॉलरशिप मिळाली आहे.
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र महासचिव मीनाक्षी गिरी प्रत्येक जिल्ह्याचे सचिव आणि त्यांची पूर्ण टीम यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. टेनिस क्रिकेट खेळाडूंना आपल्या जिल्ह्यात नोंदणी करायची असल्यास 8421050032 या नंबर वर संपर्क करायचा आहे. येत्या 24,25,26 सप्टेंबरला राज्यस्तरीय स्पर्धा नाशिक येथे होणार आहे. तसेच या स्कॉलरशिपसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी फॉर्म भरून या स्कॉलरशिपचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.