जालना (प्रतिनिधी)-अभियंता दिनानिमित्त अभियंता प्रती कृतज्ञता आणि सन्मान व्यक्त करण्यासाठी मेटारोल इस्पात च्या वतीने आयोजित ‘मेटारोल टेक्नो रन’या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये असंख्य क्रीडाप्रेमींनी सहभाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी केली. तसेच या महा विक्रमी मेटा रोल टेक्नो रनची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड कडून नोंद करण्यात आली आहे.
यावेळी मेटारोल इस्पात चे संचालक आशिष भाला म्हणाले की, फिट आणि निरोगी राहणे हे सध्याच्या काळाची गरज आहे, मी स्वतः आज औरंगाबाद येथे रण मध्ये सहभागी होऊन दहा किलोमीटर धावलो. मेटा रोलची ही धाव विक्रमी ठरून मला अभियंत्यांना समर्पित करण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी आनंददायी बाब आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेतल्याचे प्रमाणपत्र आज इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड स च्या परीक्षक रेखा सिंग यांनी जालना येथे मेटा रोल इस्पात चे संचालक आशिष झाला यांना प्रदान केले.