औरंगाबाद(प्रतिनिधी): सॉफ्टबॉल अंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी शिवछत्रपती महाविद्यालयाच्या सचिन लहाने या खेळाडूची निवड झाली असून गुंटूर आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या अंतरविद्यापीठ स्पर्धेत डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. ही स्पर्धा 23 ते 30 मार्च दरम्यान होणार आहेत.
तसेच स्पर्धेसाठी महाविद्यालय विकाससमितीचे सदस्य प्रदीप चव्हाण,प्राचार्य डॉ.आर.पी. पवार,उपप्राचार्य भरत वहाटूळे ,उप प्राचार्य राजमाने, पर्यवेक्षक संजय राऊत , प्रा. ज्ञानेश्वर धोत्रे ,क्रीडा शिक्षक डॉ. रणजित पवार ,डॉ अर्चना कोल्हे , यांनी शुभेच्छा दिल्या खेळाडूंना प्रा सागर मगरे हे प्रशिक्षण दिले.