जालना (प्रतिनिधी)- राष्ट्रीय कुडो बिग मिक्स मार्शल आर्ट स्पर्धेत सिंधुदुर्गचा सुपुत्र तेजस भालचंद्र सुर्वे याने रौप्य पदक पटकावले.भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या मान्यतेने हिमाचल प्रदेश येथील सलोन येथे ही स्पर्धा नुकतीच पार पडली. तो मुळचा नेरले (ता. वैभववाडी) येथील आहे. माजलगाव येथील त्याचे मामा बंड्या चौगुले यांच्याकडे त्याचे शिक्षण झाले.
या स्पर्धेत भारतातील 25 राज्यांमधील तब्बल 1500 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा पाच दिवस चालली होती.या स्पर्धेत 21 वर्षावरील पुरुष गटात पुढे फायटर्स म्हणून तेजस सुर्वे याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. तो सध्या पुणे दळवी नगर येथील गोल्डन ड्रॅगन मार्शल आर्ट या संस्थेत आहे. या स्पर्धेसाठी सुर्वे याला पुणे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अरविंद मोरे, सचिव राहुल पवार, सिंधुदुर्ग जिल्हा कूड कराटे आकीदो असोसिएशनचे मुख्य प्रशिक्षक वसंत जाधव (सावंतवाडी) यांचे मार्गदर्शन लाभले. या कामगिरीमुळे त्याचे कौतुक होत आहे.