टीम इंडिया आज खेळणार पहिली मॅच;

समोर आहे ‘हा’ संघ; जाणून घ्या वेळापत्रक!

यश धुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आज १९ वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. चार वेळचा चॅम्पियन भारतीय संघाची नजर आपल्या पाचव्या विजेतेपदावर असेल. भारतीय संघ आशिया चषक जिंकून येथे पोहोचला आहे, आणि सराव सामन्यात वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या भारतीय संघाने गेल्या तीन हंगामात अंतिम फेरी गाठली. हरनूर सिंग, राजवर्धन हंगरगेकर, कर्णधार यश धुल आणि रवी कुमार यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

 

 

गेल्या वेळी बांगलादेशने भारताला हरवून वर्ल्डकप जिंकला होता. या स्पर्धेतील पहिला सामना १४ जानेवारीला तर अंतिम सामना ५ फेब्रुवारीला होणार आहे. स्पर्धेत ४८ सामने खेळवले जाणार आहेत. टीम इंडियाला ब गटात स्थान देण्यात आले आहे. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्याची संधी मिळणार नसल्याने चाहते निराश झाले आहेत.

 

 

गट आणि संघ

अ गट: बांगलादेश, इंग्लंड, कॅनडा, यूएई

  • ब गट: भारत, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका, युगांडा
  • क गट: अफगाणिस्तान, पाकिस्तान, पीएनजी, झिम्बाब्वे
  • ड गट: ऑस्ट्रेलिया, स्कॉटलंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज

भारतीय संघ –

यश धुल (कर्णधार), हरनूर सिंग, अंगक्रिश रघुवंशी, एस. रशीद (उपकर्णधार), निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनिश्वर गौतम, दिनेश बाना, आराध्या यादव, राज अंगद बावा, मानव पारख, कौशल तांबे, राजवर्धन हंगरगेकर, वासू वत्स, विकी ओस्तवाल, रवी कुमार, गरव सांगवान.

 

राखीव खेळाडू: ऋषी रेड्डी, उदय सहारन, अंश गोसाई, अमृत राज उपाध्याय, अमृत राज उपाध्याय.

You might also like

Comments are closed.